आरती ज्ञानराजा
Aarti Dnyanraja
आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥
लोपलें ज्ञान जगीं ॥ हित नेणती कोणी ॥ अवतार पांडुरंग ॥ नाम ठेविलें ज्ञानी ॥ १ ॥
कनकाचे ताट करीं ॥ उभ्या गोपिका नारी ॥ नारद तुंबरहो ॥ सामगायन करी ॥ २ ॥
प्रगट गुह्य बोले ॥ विश्व ब्रह्मचि केले ॥ रामजनार्दनीं ॥ पायी मस्तक ठेविलें ॥ ३ ॥
॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.
This page is part of the family prayer library.