ॐस्मरणPrayer Library
← Back to Aarti
Aarti · Marathi

श्री दत्ताची आरती

Trigunatmaka Traimurti Datta

Reading size 100%

॥ श्री दत्ताची आरती ॥

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता । आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैसी न कळे ही मात । पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचा पुरलासे अन्त ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता । आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता ॥

दत्त येऊनियां ऊभा ठाकला । सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला । प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता । आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता ॥

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हरपलें मन झालें उन्मन । मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता । आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता ॥

॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.