दुर्गे दुर्घट भारी
Durge Durghat Bhari
॥ श्री दुर्गा देवीची आरती ॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी । वारी वारी जन्म मरणांते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ॥
त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही । चारी श्रमले परन्तु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही । ते तू भक्तालागी पावसि लवलाही ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा । अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा । नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ॥
॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.
This page is part of the family prayer library.