गजानन महाराजांची आरती
Gajanan Maharaj Aarti
जय जय सच्चित्स्वरूप स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जडमूढ ताराया ॥ धृ. ॥
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ॥ तें तूं खरोखर निःसंशय अससी । लीलामात्रें धरिलें मानव देहासी ॥ १ ॥
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा । करुनी गणि गण गणात बोते या भजना ॥ धाता हरिहर गुरुवर तूंहि सुखसदना । जिकडे पाहावे तिकडे तूं दिससी नयना ॥ २ ॥
लीला अनंत केल्या बंकटसदनास । पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस ॥ क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥ ३ ॥
व्याधि वारुन केले कैकां संपन्न । करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन ॥ भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥ ४ ॥
॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.
This page is part of the family prayer library.