खंडेरायाची आरती
Khanderaya Aarti
जय देवा खंडेराया । निजशिवरूप सखया । आरती ओवाळीतो । भावभंडारसुप्रिया ॥ धृ. ॥
देहत्रय गड थोर । हेचि दुर्घट जेजूर । तेथे तूं नांदतोसी । आत्मसाक्षित्वे निर्धार ॥ उन्मनी म्हाळसा हे । शांतिबाणाई सुकुमार । भुक्ति मुक्ति दया क्षमा । मुरळ्या नाचती सुंदर ॥ १ ॥
स्वानंद अश्व थोर त्यावरि बैसोनि सत्वर । अद्वैतबोध तीव्र हाती घेउनि तरवार ॥ अहंकार मल्लासूर त्यातें मारिसी साचार । निवटुनी दैत्यगार विजयी होसी तूं मल्हार ॥ २ ॥
निरसोनी द्वैत भाव करिसी तूं ठाणे अपूर्व । अद्वैतची भक्तदेव भेदबुद्धी मिथ्या वाव ॥ तुजवीण न दिसे कोणी जगिं या एकचि तूं धणी । मौनी म्हणे तुची सर्व अससी व्यापक खंडेराव ॥ ३ ॥
॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.
This page is part of the family prayer library.