ओवाळू आरती मदनगोपाळा
Ovalu Aarti Madan Gopala
ओवाळू आरती मदनगोपाळा। श्यामसुन्दर गळा वैजयन्तीमाळा॥
चरणकमल ज्याचे अति सुकुमार। ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥
ओवाळू आरती मदनगोपाळा…॥
नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान। ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥
ओवाळू आरती मदनगोपाळा…॥
मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी। वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥
ओवाळू आरती मदनगोपाळा…॥
जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान। तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥
ओवाळू आरती मदनगोपाळा…॥
एका जनार्दनी देखियले रूप। रूप पाहों जाता झालेसें तद्रूप॥
ओवाळू आरती मदनगोपाळा…॥
॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.
This page is part of the family prayer library.