ॐस्मरणPrayer Library
← Back to Aarti
Aarti · Marathi

पंचानन हयवाहन

Panchanan Hayavahan

Reading size 100%

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा । खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥ मणिमल्लां मर्दुनियां जो धूसुर पिवळा । हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारीं दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ॥

सुरवर संवर वर दे मजलागी देवा । नाना नामे गाईन ही तुमची सेवा ॥ अघटित गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥

रघुवीरस्मरणी शंकर हृदयीं निवाला । तो हा मल्लांतक अवतार झाला ॥ यालागीं आवडे भाव वर्णिला । रामी रामदासा जिवलग भेटला ॥ ३ ॥

॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.