ॐस्मरणPrayer Library
← Back to Aarti
Aarti · Marathi

सत्राणे उड्डाणे

Satrane Uddane

Reading size 100%

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं । सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥

जय देव जय देव जय हनुमंता । तुमचेनि प्रसादें न भिये कृतान्ता ॥ धृ० ॥

दुमदुमिले पाताळ उठला प्रतिशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥

जय देव जय देव जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ॥ धृ० ॥

॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.