ॐस्मरणPrayer Library
← Back to Aarti
Aarti · Marathi

श्री सत्यनारायणाची आरती

Shri Satyanarayan Aarti

Reading size 100%

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा । पंचारति ओंवाळू श्रीपति तुज भक्तिभावा ॥ धृ. ॥

विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण । परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥ घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण । प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तूं नारायण ॥ १ ॥

शातानंदविप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें । दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥ त्यापासूनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें । भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ २ ॥

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जे जन आचरिती । इच्छित पुरविसी त्यांतें देउनि संतति संपत्ती ॥ संहरती भवदुरितें सर्वहि बंधने तुटती । राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥ ३ ॥

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा । भक्तीपुरस्सर आचरती त्यां पावसि जगदीशा ॥ भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा । मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ ४ ॥

॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.