सुखकर्ता दुःखहर्ता
Sukhkarta Dukhharta
॥ श्री गणेश आरती ॥
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥
जय देव जय देव जय मंगल मूर्ती । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुम केशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥
जय देव जय देव जय मंगल मूर्ती । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ ३ ॥
जय देव जय देव जय मंगल मूर्ती । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥
॥ जय देव ॥
॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.
This page is part of the family prayer library.