ॐस्मरणPrayer Library
← Back to Aarti
Aarti · Marathi

श्री स्वामी समर्थांची आरती

Shri Swami Samarth Aarti

Reading size 100%

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था । जय श्री स्वामी समर्था । आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ॥ धृ. ॥

छेली खेडे ग्रामी तु अवतरलासी, राया तु अवतरलासी । जगदुद्धारासाठी राया तु फिरसी । भक्तवत्सल खरा तु एक होसी, राया तु एक होसी । म्हणुनी शरण आलो तव चरणासी ॥ १ ॥

त्रैगुण-परब्रह्म तुझा अवतार, तुझा अवतार । त्याची काय वर्णू लीला पामर ॥ शेषादिक क्षीणले नलगे त्या पार, नलगे त्या पार । तेथे जडमूढ कैसा करु मी विस्तार ॥ २ ॥

देवाधिदेवा तु स्वामी राया, तु स्वामी राया । निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया । तुजसी अर्पण केली आपुली ही काया, आपुली ही काया । शरणागता तारी तु स्वामी राया ॥ ३ ॥

अघटित लीला करुनी जडमूढ उद्धारिले, जडमूढ उद्धारिले । कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे । चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले, मज हे अनुभवले । तुज्या सुता नलगे चरणा वेगळे ॥ ४ ॥

॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.