तुकाराम महाराजांची आरती
Aarti Tukarama
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा । सच्चिदानंदमूर्ती । पाय दाखवीं आम्हां ॥ धृ. ॥
राघवें सागरांत । पाषाण तारीले । तैसे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले ॥ १ ॥
तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आले । म्हणोनी रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥ २ ॥
॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.
This page is part of the family prayer library.