ॐस्मरणPrayer Library
← Back to Aarti
Aarti · Marathi

विष्णूची आरती

Narayan Khagvahan

Reading size 100%

नारायण खगवाहन चतुराननताता । स्मरअरितापविमोचन पयनिधिजामाता ॥ वैकुंठाधिपते तव महिमा मुखीं गाता । सहस्रमुखांचा तोही थकला अनंता ॥ १ ॥

जय देव जय देव जय लक्ष्मीकांता । मंगल आरति करितो भावे सुजनहिता ॥ धृ. ॥

सदैव लालन पालन विश्वाचे करिसी । दासास्तव तू नाना अवतार धरिसी ॥ दुष्टा मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी । निशिदिनी षण्मुखताताते हृदयी स्मरसी ॥ २ ॥

चपला सहस्र जयाच्या जडल्या वसनासी । कोटिशशि क्षयविरहित शोभति वदनासी ॥ कौस्तुभमुकुटविराजित मूर्ती अविनाशी । ज्याते हृदयी ध्याता भवभय अघ नाशी ॥ ३ ॥

तारी वारी संकट मारी षड्रिपुला । स्मरती त्याते देई संपत्ती विपुला ॥ तापत्रय जाळितसे निशिदिनी मम वपुला । दास म्हणे वोसंगा घे बालक आपुला ॥ ४ ॥

॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.