ॐस्मरणPrayer Library
← Back to Aarti
Aarti · Marathi

श्री विठोबाची आरती

Yuge Aththavis Vitevari Ubha

Reading size 100%

॥ श्री विठोबाची आरती ॥

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं । कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळां । राही रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सांवळा ॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥

ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती । चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती । दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओंवाळिती ॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥

॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.