येई हो विठ्ठले
Yei Ho Vitthale
येई हो विठ्ठले माझे माऊली ये । निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला । गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ २ ॥
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दीपावळी । विष्णुदास नामा जीवेभावे ओंवाळी ॥ ३ ॥
॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.
This page is part of the family prayer library.